सद्गुरू भक्ती हीच परमेश्वर भक्ती – ह.भ.प. बालाजी महाराज कुलथे

एमपीसी न्यूज – “सद्गुरुभक्ती हीच परमेश्वरभक्ती होय, असे विचार ह.भ.प. बालाजीमहाराज कुलथे यांनी व्यक्त केले. थेरगाव येथील अशोका कॉलनी येथे सोमवारी (दि.7) श्री सद्गुरू गाडे आण्णा महाराज यांच्या सहाव्या पुण्यतिथी सोहळ्यात ते बोलत होते.

श्री सद्गुरू साधुबाबामहाराज ब्रह्मसंप्रदाय संस्था, थेरगाव आयोजित श्री सद्गुरू गाडे आण्णा महाराज यांच्या सहाव्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प. अशोकमहाराज गोरे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, शोभा जोशी, तानाजी एकोंडे, राधाबाई वाघमारे, सुभाष चव्हाण, जयश्री गोवंडे, नारायण कुंभार, संगीता सलवाजी, दिलीप कुंभार आदी उपस्थित होते.

Khadki news: खडकी येथील श्रीराम मंदिर देवस्थान येथे दीपोत्सव

ह.भ.प. बालाजीमहाराज कुलथे यांनी संत एकनाथमहाराज यांच्या ओवीवर निरूपण करताना, “मृत्युलोकी मानवी देह हा अप्राप्य आहे, हे संतांनी ओळखले; परंतु सामान्य प्रापंचिक माणसाला या अनमोल देहाची किंमत वाटत नाही. त्यामुळे तो मोह पाशात अडकतो, व्यसनाधीन होतो. वास्तविक स्वर्गातील देवदेवताही मानवी देह धारण करायला मिळावा म्हणून अवतार घेण्याची आकांक्षा बाळगतात; कारण मानवाला देहाच्या माध्यमातून परमेश्वरभक्ती करता येते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

श्री सद्गुरू साधुबाबामहाराज ब्रह्मसंप्रदाय संस्था, थेरगाव साधक परिवाराने संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कंक यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.