Deepotsav : त्रिपुरारी पौणिमेनिमित्त दीपोत्सव साजरा

एमपीसी न्यूज – पूर्णानगर विकास कृती समितीच्या वतीने त्रिपुरारी पौणिमेनिमित्त (Deepotsav) दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी लक्ष लक्ष दिव्यांनी परिसर उजळून निघाला होता.

पूर्णानगर येथील शनी मंदिर क्रीडांगण येथे झालेल्या दीपोत्सवाचे उद्घाटन माजी महापौर मंगला कदम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक सुनिल कदम, संस्थापक अध्यक्ष नारायण बहिरवाडे, शैलश मोरे,  अनिल सोमवंशी, श्रीकांत करोली,  दीपक पाटील,  विलास मराठे, दीपक चाळके, सत्यवान हुलसुरे,  भटू पाटील, गणेश काळोरे, विजय सुरवसे, काळे साहेब,  राजेंद्र हल्ली,  बबन बागडे,  वाणी सर,  ऋषिकेश जाधव,  शिवाजी खराटे उपस्थित होते.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या भोसरी विधानसभेच्या महिला कार्याध्यक्षा ज्योती गोफणे, माया लद्धा यांचा अभिष्टचिंतन सोहळा पूर्णानगर विकास कृती तर्फे साजरा करण्यात आला.

सद्गुरू भक्ती हीच परमेश्वर भक्ती – ह.भ.प. बालाजी महाराज कुलथे

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, रावसाहेब थोरात, नेताजी काशीद, आबासाहेब भोसले, प्रदीप सपकाळ, युवराज कोकाटे, भालेकर साहेब इत्यादी व अनेक मान्यवरांनी उपस्तीथी दर्शवली. (Deepotsav) काशिनाथ जगताप, ज्योती जाधव, सारिका पवार, योगेश मोरे, शिवाजी कणसे, संपदा नंदिवडेकर, ज्योती जाधव यांनी देखील सहभाग घेतला.

समितीचे जेष्ठ सदस्य अशोक गायकवाड, ज्ञानेश्वर नागरगोजे, हरिभाऊ नारायण शेळके, भोसले,  पवन साली, वसंत अवसरीकर, जेष्ठ कलावंत,परिसरातील सर्व महिला, पुरुष, तरुण देखील आवर्जून उपस्तिथ होते.(Deepotsav) विशेष सहकार्य श्री स्वामी समर्थ युवामंच टीम व शिवपूर्णा प्रतिष्ठानचे अनिकेत पवार यांनी केले. सूत्रसंचालन राजाराम सावंत यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.