Alandi News : आळंदी मध्ये सफला एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी

एमपीसी न्यूज :  सफला एकादशी निमित्त सोमवारी आळंदी मध्ये (Alandi News) संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर संजीवन समाधी दर्शना करिता माऊलींच्या मंदिरात वारकरी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांसाठी मंदिरामध्ये (उपवासाच्या पदार्थाचे )महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

पवित्र इंद्रायणी नदी तीरावर स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली होती.प्रदक्षणा रस्त्यावर काही दिंड्या ज्ञानोबा माऊलीं च्या नामघोषात खांद्यावर पताका घेत,टाळ, वीणा, मृदंगाच्या गजरात ,महिला डोक्यावर तुळशी वृंदावन,विठ्ठल रुक्मिणी मूर्ती घेत अश्या भक्तिमय वातावरणात त्या नगर प्रदक्षणा पूर्ण करत होत्या.

Mumbai Pune Expressway Accident : बोरघाटात वऱ्हाडाच्या बसला अपघात, एक जण ठार

एकादशी निमित्त मंदिरा मध्ये आकर्षक अशी फुलसजावट करण्यात आली होती.चावडी चौक येथील लोखंडी गेटचा एक बाजूचा दरवाजा तुटल्याने मंदिर परिसरात (Alandi News) दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात नो पार्किंग च्या जागेत त्या लावण्यात आल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.