Mumbai Pune Expressway Accident : बोरघाटात वऱ्हाडाच्या बसला अपघात, एक जण ठार

एमपीसी न्यूज : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway Accident) आज सकाळी भीषण अपघात झाला. एका वऱ्हाडाच्या बसला एका कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात झाला. यामध्ये बस चालक ठार झाला तर अन्य नऊ जण जखमी झाले आहेत. ही घटना बोरघाटात खोपोली जवळ घडली. अपघातानंतर मोठी वाहतूककोंडी झाली होती.

आज सकाळी पुणे- मुंबई एक्स्प्रेसवे वर बोरघाटातील अपघातात बस चालक मरण पावला आहे. तर बसमधील 2 प्रवासी गंभीर व 7 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अशी माहिती बोरघाट  महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उप निरीक्षक निल शिंदे यांनी दिली आहे. बस चालक संकेत सावंत, वय अंदाजे 35 वर्षे हा जागीच मयत झाला होता.

 

 

Pune : लॉयला करंडक फुटबॉल स्पर्धेत सेंट व्हिन्सेट उपांत्य फेरीत दाखल

सकाळी 06:55 वाजताचे सुमारास मुंबई पुणे लेनवर ट्रेलरने खाजगी बसला मागून जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच लगेच महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट चा स्टाफ घटनास्थळासाठी रवाना झाला होता.

अपघात ठिकाणी उतार असल्याने ट्रेलरच्या चालकाचे ट्रेलरवरील नियंत्रण सुटल्याने समोर चालणारी श्री दुर्गा माऊली ट्रॅव्हल्स ची खाजगी बस क्र. MH 48 AY 7999 ला पाठीमागून जोरदार धडक दिली. सदर ट्रॅव्हल्स बस लोखंडी रेलिंगलवर आदळून अपघात झाला होता. या अपघातात बस चालक संकेत सावंत, वय अंदाजे 35 वर्षे हा जागीच मयत झाला असून त्याचे शव पुढील कार्यवाही करीता नगरपालिका हॉस्पिटल खोपोली येथे पाठविले होते.

बस मधील 35 प्रवाशांपैकी 02 गंभीर व 02 किरकोळ जखमी झाले होते. या प्रवाशांना एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचाराकरीता पाठविण्यात आले होते. इतर 05 ते 06 किरकोळ जखमी प्रवासी यांच्यावर जागेवरच प्रथमोपचार करण्यात आले.

ट्रेलर वरील चालक हा अपघातस्थळावरून पळून गेला असल्याने त्याचे नाव समजले नाही. अपघातातील बस आयआरबी कडील हायड्राच्यासहायाने रोडच्या बाजूला घेतली असून रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. अपघातस्थळी बोरघाट केंद्राचा स्टाफ, खोपोली पोलीस ठाणे कडील स्टाफ, आरटीओ अधिकारी, देवदूत टीम, आयआरबी पेट्रोलिंग व्हॅन, मृत्यूंजय दूत हजर होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.