Pimpri : छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पुर्ण झाली आहेत, त्यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी (Pimpri) -चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने या वर्षीच्या ऐतिहासिक सोहळ्याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शहरातील 14 पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

Pune : डॉ. सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीपासून अभिवादनाची सुरूवात करण्यात आली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, उप आयुक्त अजय चारठाणकर, रविकिरण घोडके, मनोज लोणकर, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, आण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी सोनम देशमुख, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, चारुशिला जोशी आदी उपस्थित होते.

यानंतर आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते भक्ती शक्ती चौक, निगडी येथील छत्रपती शिवाजी महाराज व जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या समूह शिल्पास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, अ क्षेत्रिय अधिकारी सुचिता पानसरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, धनाजी येळकर पाटील,संजय जाधव, जीवन बो- हाडे, दादासाहेब पाटील, गणेश सरकटे पाटील, संतोष वाघे, प्रशांत कदमापूरे, हेमलता लांडेपाटील, गणेश भांडवलकर, सचिन आल्हाट,गोविंद पवार, मोईन शेख, किशोर अट्टरगेकर आदी सामजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

एच.ए. कॉलनी पिंपरी (Pimpri) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उप आयुक्त रविकिरण घोडके, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सुरेंद्र पासलकर, मारुती लोखंडे, तात्या माने, संजय खेंगरे, सर्जेराव जुनवणे, अरुण बोऱ्हाडे,रमेश जाधव, मारुती बोरावके, अविनाश थोपटे, अनुप सिंग उपस्थित होते.

तसेच अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते पिंपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास देखील अभिवादन करण्यात आले. यावेळी क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्याधिकारी कुंडलिक दरवडे उपस्थित होते. मोहननगर, चिंचवड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अ क्षेत्रिय अधिकारी सुचिता पानसरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यावेळी माजी नगरसदस्य मारूती भापकर तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

लांडेवाडी, कासारवाडी, फुगेवाडी आणि दापोडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ह क्षेत्रिय अधिकारी उमेश ढाकणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सहाय्यक आरोग्याधिकारी बाबासाहेब कांबळे उपस्थित होते. ब क्षेत्रिय अधिकारी अमित पंडित यांनी प्रेमलोक पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले. ई प्रभागाचे क्षेत्रिय अधिकारी राजेश आगळे यांनी भोसरी येथील पी.एम.टी चौक तसेच मोशी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी प्रशासन अधिकारी नाना मोरे, कार्यालय अधिक्षक ज्ञानेश्वर ढवळे उपस्थित होते.

रहाटणी, थेरगाव गावठाण, डांगे चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ग क्षेत्रिय अधिकारी शितल वाकडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहाय्यक आरोग्याधिकारी कुंडलिक दरवडे तसेच प्रभागातील कर्मचारी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.