Pune : संभाजी उद्यानातील स्मारकाचा वाद पुन्हा उफाळणार

आमदार अनिल भोसले आंदोलनाच्या तयारीत

एमपीसी न्यूज –  राज्यभरात मराठा आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला आहे. परळीमध्ये सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाने आता राज्यभर आक्रमक रूप धारण केल आहे. अनेक ठिकाणी हिंसेचा आगडोंब उडाला असताना आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या घर,कार्यालयासमोर मराठा आंदोलन ठिय्या देऊन घोषणाबाजी करत आहेत. 

आज मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी आमदार अनिल भोसले यांच्या पुण्यातील कार्यलयासमोर ठिय्या देत घंटानाद आंदोलन केले. यावेळी अनिल भोसले यांनी निवेदन स्वीकारत आरक्षणाच्या मागणीला पाठींबा दिला. त्याचबरोबर पुण्यातील संभाजी उद्यानातील संभाजी महाराजांच्या स्मारकाविषयी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षणाचा प्रश्न मिटल्यावर आपल्या महाराजांच्या स्मारकासाठी आंदोलनात उताराव लागेल अशी भूमिका अनिल भोसले यांनी मांडली आहे.  

 “आपण संभाजी महाराज याचं संभाजी उद्यानात स्मारक करत आहोत. त्यासाठी मी आमदार निधीतून मंजूर केलेला साडे तीन कोटी रुपये निधी खर्च देखील केला आहे. आज आपण आपल्याला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करत आहोत मात्र त्याठिकाणी संभाजी महाराजांचे स्मारक का होऊ देत नाही काम का अपूर्ण राहिले आहे, यासाठी देखील आंदोलन करावे लागणार आहे. संभाजी उद्यानात काही सत्ताधारी मंडळी स्मारक होऊ न देण्याच काम करत आहेत. त्यामुळे आपले 9 तारखेचे आंदोलन झाल्यानंतर पुणे महानगर पालिकेच्या समोर संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी आग्रही होऊन बसायचं आहे.” स्पष्ट मत आमदार अनिल भोसले यांनी  मांडले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.