Lonavala : स्त्री मनाच्या आत्मस्वरातून उलगडले स्त्री मनाचे पैलू

लोणावळा महाविद्यालयात महिला सबलीकरण उपक्रम

एमपीसी न्यूज – महिला सबलीकरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्त्री मनाचे आत्मस्वर’ या कार्यक्रमातून आकाशवाणीच्या ज्येष्ठ निवेदिका डाॅ. प्रतिमा जगताप यांनी महिलांच्या मनाचे अनेक पैलू उलगडून सांगितली. लोणावळा महाविद्यालयाच्या महिला सबलीकरण समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
     

लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका अॅड. निलिमा खिरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. बी.एन.पवार व प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थींनी उपस्थित होत्या. यावेळी बोलताना जगताप यांनी संत जनाबाई, विठाबाई, सावित्रीबाई फुले यांच्या पासून ते आजच्या काळातील सिंधुताई सपकाळ, अरुमिना सिंन्हा यांच्या पर्यतची अनेक उदाहरणे देत महिलांच्या जिवन व चरित्रप्रवासाचे पैलू उलगडले, त्या म्हणाल्या महिलांना उंबरा ओलंडता आला पाहिजे तसेच जे कराल ते उत्कृष्ट असले पाहिजे असे सांगितले. प्राचार्य पवार म्हणाले स्त्रीच्या शारिरिक, शैक्षणिक, भावनिक आणि सांस्कृतिक बलस्थांनांचा विचार व्हायला हवा, अशा कार्यक्रम‍ांमधून महिलांच्या मनातील न्युनगंड कमी होण्यास मदत होईल. महिला सबलीकरण समितीच्या लतिका बळी म्हणाल्या महिलांच्या आर्थिक व सामाजिक सबलीकरणाबरोबर विचार प्रक्रियेमधील महिलांचा सहभाग वाढायला हवा.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी लतिका मरगळे व प्रा. शशिकला ठाकर यांनी केले तर कनिष्ठ विभाग प्रमुख सविता पाटोळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.