Lonavala : राज्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून 90 कोटी मिळाल्याने लोणावळाच्या विकासाला चालना – सुरेखा जाधव

एमपीसी न्यूज – गेली 25 वर्षे मी नगरसेविका आणि दोन वेळा नगराध्यक्षपद लोणावळा शहरात भूषवले आहे. परंतु जेव्हा शिवसेना भाजपा युतीचे सरकार तालुक्यात आले तेव्हा राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून आमच्या लोणावळा शहराला ९० कोटींचा निधी उपलब्ध झाला. यामुळे आम्ही आमच्या लोणावळा शहराचा विकास करू शकलो, असे मत लोणावळा शहराच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी व्यक्त केले आहे.

वलवन येथे राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रचार रॅलीचे बुधवारी सकाळी ‘जय भवानी जय शिवाजी’ च्या घोषणांनी जोरदार पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. मंगळवारी तळेगाव दाभाडे येथे झालेल्या मुख्यमंत्री यांच्या सभेचे पडसाद लोणावळा शहरात बुधवारी पाहण्यास मिळाले. अनेक नागरिक आजच्या प्रचारात आनंदाने व स्वतःच्या मर्जीने मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचे दिसून आले. आज वलवन, पांगोळी, तुंगार्ली, इंदिरानगर, गवळीवाडा, नांगरगाव, जुना खंडाळा, भांगरवाडी आदी परिसरामध्ये जोरदार प्रचाराचे वातावरण दिसून आले आणि संपूर्ण लोणावळा शहर भाजपमय झाल्याचे चित्र दिसत होते.

नगराध्यक्षा जाधव यांनी बुधवारी प्रचाराची धुरा सांभाळली. आमच्या शहराचा राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केलेला विकास हा तालुक्याला मिळणाऱ्या मंत्रिपदाची साक्ष आहे. कोणी कितीही खोट्या थापा मारल्या तरी लोणावळा शहरातून राज्यमंत्री बाळा भेगडे यांना नक्कीच आघाडी मिळणार हा आमचा विश्वास आहे. लोणावळा शहरात राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून शहरासाठी पाणी योजना, कचरा डेपो, उड्डाणपूल, तळ्याचे काम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात अस्तित्वात नसलेल्या अनेक रस्त्यांची कामे ज्यामुळे अनेक वाड्या वस्त्या जोडल्या गेल्या अशी अनेक विकासकामे करण्यात आली. ज्यामुळे लोणावळा शहराची प्रगती झाली.

लक्ष्मी घड्याळात नाहीतर कमळात

नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या, लक्ष्मी घड्याळात किंवा हाताच्या पंजावर नाही येत ती फक्त कमळात येते, त्यामुळे आपल्या मावळच्या विकासासाठी आणि मावळात भरघोस निधी आणण्यासाठी आपल्याला कमळाला मतदान करायचे आहे, असे त्यांनी नागरिकांना सांगितले. आज लोणावळा व परिसरातील वाड्या वस्त्यांमध्ये राज्यमंत्री भेगडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सर्वत्र युवा कार्यकर्त्यांची राज्यमंत्री भेगडे यांच्यासोबत सेल्फी घेण्यास झुंबड उडाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like