Sangavi : परदेशी महिलेकडून वेश्या व्यवसाय करवून घेतल्या प्रकरणी एका महिलेला अटक

एमपीसी न्यूज- युगांडा येथील महिलेकडून वेश्या व्यवसाय (Sangavi) करवून घेतल्या प्रकरणी सांगवी पोलिसांनी तीन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. तर त्यातील एका महिला आरोपीला अटक कऱण्यात आली आहे.

सांगवी येथील विशालनगर येथील सोसायटीमधील फ्लॅटवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने गुरुवारी (दि.17) केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युगांडा येथील महिलेकडून पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे हा सारा प्रकार सांगवी येथील एका (Sangavi) सोसायटीच्या फ्लॅटमध्ये सुरु होता.

Dighi : बांधकाम साईटवरून साहित्य चोरणाऱ्या तिघांना अटक

पोलिसांनी छापा टाकून पीडित महिलेची सुटका केली आहे. तर फ्लॅट ची मालकीण व इतर दोघींवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून एका महिलेला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.