Sangavi : कचऱ्याच्या डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज : कचऱ्याच्या डंपरने दुचाकीला (Sangavi) धडक दिली. त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 19) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडली.

संकेत गणेशराव वानखडे (वय 24, रा. शिवाजीनगर, पुणे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी डॉ. अक्षय भीमराव वानखडे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर (एमएच 12/एसएक्स 38478) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : शतपावली करणाऱ्या व्यक्तीस भरधाव कारची धडक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ संकेत हे जुनी सांगवी येथून त्यांच्या दुचाकीवरून जात होते. बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास (Sangavi) राजीव गांधी ब्रिज चेक पोस्ट जवळ कचऱ्याच्या डंपरने संकेत यांच्या दुचाकीला धडक दिली. यात संकेत यांचा मृत्यू झाला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.