Maval : मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील 48 शाळा दोन दिवस बंद

एमपीसी न्यूज – घाट भागात बुधवारी (दि. 19) झालेल्या (Maval) पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज (गुरुवारी, दि. 20) आणि उद्या शुक्रवारी (दि. 21) दुर्गम भागात असलेल्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. या भागातील अंगणवाड्याही आज आणि उद्या बंद ठेवल्या जाणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार आंबेगाव (73), भोर (36), जुन्नर (35), खेड (36), मावळ (48), मुळशी (67), पुरंदर (17) आणि वेल्हे (43) तालुक्यातील एकूण 355 दुर्गम भागातील शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.

ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आणि सीडीपीओ यांनी परिसरात असणे आणि सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापक शाळेत उपस्थित राहतील. हा आदेश अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद, सर्व मंडळांशी संलग्न अनुदानित व खाजगी शाळांना लागू आहे. इतर सर्व भागातील शाळा आणि अंगणवाड्या सामान्यपणे चालू राहतील, असेही आदेशात म्हटले आहे.

मावळ तालुक्यातील बंद असलेल्या शाळा – (Maval)

सावळा माळेगाव
कळकराई माळेगाव
मालेगाव खुर्द माळेगाव
खांडी
खांडी निळशी
कांब्रे अंदर मावळ कांब्रे पठार
कुणे अनसुटे मोधळेवस्ती
वडेश्वर सटवाईवाडी
कल्हाट गावठाण
कल्हाट धनवेवस्ती
कल्हाट करवंदेवस्ती
निगडे कुरणवस्ती
शिरदे
उकसान पठार
खांडशी
करंजगाव पठार
कचरेवाडी टाकवे बुद्रुक
उदेवाडी वनाटी
कुरवंडे
दुधिवरे
लोहगड घेरेवाडी
धालेवाडी
मालेवाडी
महागाव निकमवाडी
आंबेगाव
आंबेगाव शिंदगाव
शिवली
शिवली खडकवाडी
शिवली काटेवाडी
शिवली येवलेवाडी
चावसर विठ्ठलवाडी
चावसर दळवीवस्ती
चावसर कोटमवाडी
मोरवे धनगरवस्ती
मोरवे कातकरवस्ती
मोरवे सुर्वेवस्ती
शिळीम बोडशीळ
शिळीम शिंदेवाडी
शिळीम वाघेश्वर
नवलख उंब्रे कोयते वस्ती
नवलख उंब्रे शेटेवस्ती
बधलवाडी बधालेवस्ती
जाधववाडी
मिंडेवाडी
कुसगाव पवन मावळ
कुसगाव पवन मावळ वाघजाई वस्ती
आपटी आतवन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.