Chikhali : किरकोळ कारणावरून तिघांना मारहाण

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून तिघांना (Chikhali) मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 18) रात्री दहा वाजताच्या सुमारास कुदळवाडी येथे घडली.

अब्दुल्ला मोहम्मदखान शरीबउलहक खान (वय 21, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशिष अजलव आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maval : मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील 48 शाळा दोन दिवस बंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पत्नी आणि शेजारी राहणाऱ्या महिलेचे भांडण झाले. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी (Chikhali आणि त्यांच्या मेव्हण्याला मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांचा भाऊ आला असता आरोपींनी त्याला देखील मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.