Sangavi News: ‘माझे कुटुंब तुमच्यामुळे आजारी’, हे तुम्ही होऊ देऊ नका’

सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी पुराणिक यांची विनवणी; डासांमुळे हैराण नागरिक संतप्त

एमपीसी न्यूज – पिंपळेगुरव, सांगवीतील नदीकाठचे नागरिक डासांमुळे हैराण झाले आहेत. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी” हे आम्ही काटेकोरपणे पाळतच आहोत. पण “माझे कुटुंब तुमच्यामुळे आजारी” हे तुम्ही होऊ देऊ नका, अशी विनवणी सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी पुराणिक यांनी केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुराणिक यांनी म्हटले आहे की, पिंपळेगुरव, सांगवीमध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नागरीकांना रात्र-रात्र झोप येत नाही. संध्याकाळ झाली की डासांचे “ ढल गया दिन हो गई शाम आने दो आना है” चालू होते. रात्रभर बॅट घेऊन डासांना मारत बसावे लागते. वैतागून शेवटी सर्वांना “ अभी-अभी तो आये हो अभी-अभी जाना है” म्हणावे लागत आहे.

महापौर आणि सर्वांचे लाडके, कार्यक्षम, दक्ष नगरसेवक फक्त कधीतरी डासांची गाडी पाठवून धुराळा उडवून देतात. कदाचित यांना डास चावत नाही किंवा हे सर्व कोरोना सोबतच डेंग्यू मलेरीयाची वाट पहात आहेत.

नदीतील जलपर्णीची महापौरांकडून फक्त पाहणी होते. त्याच्या बातम्या येतात. प्रत्यक्षात कारवाई काहीच होत नाही. आता तर असे वाटायला लागले आहे की थोड्याच दिवसात कोरोनापेक्षा जास्त डेंग्यु मलेरीयाचे पेशंट वाढतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.