Sangavi : रस्त्यात अडवून वार करत तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज – पादचारी व्यक्तीला (Sangavi) अडवून खिशातून पैसे काढून घेतले. त्यानंतर व्यक्तीच्या डोक्यात वार करून जखमी करत आरोपी चौघेजण पळून गेले. ही घटना गुरुवारी (दि. 15) मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास शितोळे नगर, जुनी सांगवी येथे घडली.

बलदेवसिंग दिलबागसिंग चौहान (वय 31, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Police : पुणे पोलिसांनी थेट मुंबईला जाऊन लाखोंची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा केला पर्दाफाश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौहान (Sangavi) हे गुरुवारी मध्यरात्री शितोळे नगर येथील स्पायर रोडने चालत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून चौघेजण आले. त्यांनी चौहान यांना अडवून त्यांच्या खिशातील पाकिटातून 1 हजार 530 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर धारदार हत्याराने चौहान यांच्या डोक्यात मागील बाजूला वार करून आरोपी पळून गेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.