Pune Police : पुणे पोलिसांनी थेट मुंबईला जाऊन लाखोंची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा केला पर्दाफाश

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांनी (Pune Police) थेट मुंबईला जाऊन लाखोंची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. मुंबईतील मुलुंड येथील बजाज फायनान्स कंपनीचे खोटे नाव घेऊन लोकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या कॉल सेंटरला पुणे पोलिसांनी उध्वस्त केले असून यामध्ये 40 मोबाईल फोन आणि 7 हार्ड डिस्क जप्त केल्या आहेत.

Hinjawadi : रोख रक्कम व गाडीसाठी विवाहितेचा छळ; हिंजवडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल

पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये लाखोंची फसवणूक केल्याची तक्रार आली होती. या प्रकरणाचा शोध घेत पुणे पोलीस मुलुंडमधील कॉल सेंटरमध्ये पोहचले. येथे 43 कर्मचारी कार्यरत आहेत. जे लोकांना बजाज फायनान्सचे नाव घेऊन लाखोंचे बिनव्याजी कर्ज देण्याचे खोटे आश्वासन देऊन त्यांना लिंकवर क्लिक करायला सांगून लाखो रुपये बळकवण्याचे काम करत होते. अशा कॉल सेंटरवर धाड टाकून पोलिसांनी (Pune Police) हा डाव उध्वस्त केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.