Sangvi : ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 11) पिंपळे निलख येथे सायंकाळी घडली.

कमल नामदेव ढवळे (वय 68, रा. सह्याद्री बंगला, जगताप डेअरी, विशालनगर, पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास कमल या त्यांच्या घरापासून नीता पार्ककडे रस्त्याने पायी चालल्या होत्या. त्या फूटपाथवरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 28 ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरून नेली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक आहेर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.