Sangvi crime News : कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

दिराने विवाहितेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला.

एमपीसी न्यूज – कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच दिराने विवाहितेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना बोपोडी, पुणे येथे 1 फेब्रुवारी 2016 पासून 1 सप्टेंबर 2020 या कालावधीत घडली.

याबाबत पीडित विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पती, सासू, सासरा आणि दोन दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जाचे पैसे देण्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी विवाहितेला माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत शिवीगाळ आणि मारहाण केली. यावरून विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिला.

एका दिराने विवाहितेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत विवाहितेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.