Alandi news: आळंदी, चाकणमधून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – आळंदी आणि चाकण परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्या आहेत. याबाबत आळंदी आणि चाकण पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

निळोबा किशन मुंडे (वय 42, रा. च-होली खु. ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुंडे यांनी त्यांची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्रो दुचाकी (एम एच 14 / ई एल 2791) 20 ऑगस्ट रोजी खेड तालुक्यातील धानोरे गावातील इन्होल्युट या कंपनीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या पार्किंगमधून मुंडे यांची दुचाकी चोरून नेली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

बाळासाहेब नारायण शिंदे (वय 40, रा. झीत्राईमळा, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिंदे यांनी त्यांची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्रो दुचाकी (एम एच 11 / सी ए 1278) 28 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. रात्री त्यांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार 29 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.