Sangvi Crime News : वडिलांच्या जमिनीच्या प्लॉटसाठी विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – वडिलांच्या नावावरील जमिनीचा प्लॉट सासरच्या लोकांच्या नावावर करून देण्याची मागणी करत तसेच मुलगा होत नसल्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. याबाबत पती, सासू आणि नणंदेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती अतुल अकाराम वावरे, सासू रमा वावरे, नणंद अंजु संजय बेलसर (सर्व रा. शिरसोली, पो. खडकी, ता. आष्टी, जि. वर्धा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या लोकांनी विवाहितेकडे माहेरहून सोने, पैसे आणण्याची मागणी केली. तसेच विवाहितेच्या वडिलांच्या नावावर औंध येथे असलेला प्लॉट सासरच्या लोकांच्या नावावर करून देण्याची मागणी केली.

विवाहितेला दोन मुली झाल्या. तिला मुलगा होत नसल्याच्या कारणावरून शारीरिक व मानसिक त्रास दिला.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.