Sangvi News : सांगवी, तळेगावमध्ये गुटखा विक्री प्रकरणी कारवाई; चौघांना अटक

एमपीसी न्यूज – सांगवी येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने तर तळेगाव दाभाडे येथे गुन्हे शाखेच्या युनिट पाचने गुटखा विक्री प्रकरणी कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. दोन्ही कारवायांमध्ये 58 हजार 317 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या दोन्ही कारवाया मंगळवारी (दि. 8) करण्यात आल्या.

महाराणा प्रताप चौक, सांगवी येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका टपरीवर कारवाई केली. टपरीमधून 6 हजार 868 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. त्यात रुतीक मुरलीधर साळुंके (वय 21, रा. जुनी सांगवी) याला अटक करण्यात आली. रुतीक याने त्याच्या टपरीमधील गुटखा खेतमल उर्फ हेमंत भिमराज ओसवाल (वय 44, रा. जुनी सांगवी) याच्याकडून आणला होता. पोलिसांनी आरोपी ओसवाल याच्या घरी छापा मारून कारवाई करत घरातून 16 हजार 52 रुपयांचा गुटखा जप्त केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=2WLp62RFNyY

तळेगाव दाभाडे येथे एका किराणा दुकानात कारवाई करून गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी निहार गोपाळ विश्वास (वय 49, रा. तळेगाव दाभाडे. मूळ रा. कोलकाता), रोहित गुलाब रॉय (वय 18, रा. तळेगाव दाभाडे. मूळ रा. उत्तर प्रदेश) या दोघांना अटक केली. आरोपींनी त्यांच्या किराणा दुकानात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी ठेवला. पोलिसांनी 35 हजार 397 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

https://youtu.be/E3jTgxKBl8g

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.