Sangvi : चिमुकल्या बहिणींनी बांधल्या सैनिक बांधवांना राख्या

सीएनएस स्कूलच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त उपक्रम

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील सीएनएस स्कूलच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त शाळेच्या बालचमुंनी सैनिकांना राख्या बांधल्या. या राख्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केल्या असून काही राख्या देशाच्या सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांना देखील पाठविण्यात आला.

औंध सैनिक छावणीमधून सैनिकांना आमंत्रित करण्यात आले. प्लेग्रुप ते सिनिअर केजी मधील विद्यार्थ्यांनी राख्या बनविल्या. देशाची सुरक्षा आणि सैनिकांचे योगदान याबाबत मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

संचालिका अपर्णा गडकरी म्हणाल्या, “देशात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सैनिक आपले कर्तव्य निष्ठेने बजावतात. प्रसंगी प्राणांची आहुती देखील देतात. त्यांच्या या देशप्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. सैनिकांप्रति आदर आणि देशप्रेमाची भावना विद्यार्थ्यांमध्ये जागृत व्हावी ही या कार्यक्रमाची मूळ संकल्पना आहे. देशाच्या विकासात सैनिकांचे योगदान अमूल्य आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.