Sangvi: मुलासोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून आईला धमकी; चौघांवर गुन्हा

Sangvi: Threats mother over quarrel with child; Crime on four चाकू, लोखंडी रॉडचा धाक दाखवून 'चैतन्य कोठे आहे, आम्हाला दाखवा' असे म्हणत शिवीगाळ केली.

एमपीसी न्यूज- तरुणासोबत किरकोळ कारणावरून भांडण झाल्याने चार जणांनी मिळून त्या तरुणाच्या आईला धमकी देत शिवीगाळ केली. ही घटना रविवारी (दि.14) रात्री विनायक नगर पिंपळे निलख येथे घडली.

शुभांगी राजू आहिरे (वय 34, रा. विनायक नगर, पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अजय पिल्ले, शंकर रोडगे, अनिकेत आल्हाट, अजय (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. पिंपळे निलख) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा चैतन्य याच्यासोबत आरोपींची किरकोळ कारणांवरून भांडणे झाली होती. त्या भांडणाच्या कारणावरून आरोपी चाकू आणि लोखंडी रॉड घेऊन फिर्यादी यांच्या घरी आले.

चाकू, लोखंडी रॉडचा धाक दाखवून ‘चैतन्य कोठे आहे, आम्हाला दाखवा’ असे म्हणत शिवीगाळ केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.