Satara : भरधाव कार झाडाला धडकून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

पुणे-सातारा रस्त्यावर काशीळ गावाजवळील घटना

एमपीसी न्यूज- कारचालकाचा ताबा सुटल्यामुळे कर झाडाला धडकून झालेल्या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील सहाजण मृत्युमुखी पडले. हा अपघात पुणे-सातारा महामार्गावर काशीळ या गावाजवळ आज सकाळी झाला. या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. सौदागर कुटुंबातील सहाजण या अपघातात ठार झाले.

सौदागर कुटुंबीय पुणे-बंगळुरु महामार्गावरुन जात असताना हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला, एक लहान मुलगा आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. गाडीचा चालक आणि एक लहान मुलगी गंभीर जखमी आहेत. सौदागर कुटुंबीय हे कर्नाटकमधील धारवाडचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.