Maval : पवना धरण 81.23 टक्के भरले ! अंदाजे 240 दिवस पुरेल इतका पाणीसाठा

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असून गेल्या 24 तासात 130 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणातील आजचा पाणीसाठा 81.23 टक्के असून गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात 6.99 टक्के वाढ झाली आहे. सध्या धरणात असलेला पाणीसाठा अंदाजे 200 ते 240 दिवस पुरेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

1 जूनपासून पाणलोट क्षेत्रात १८७६ मिमि पावसाची नोंद झाली आहे. आजमितीला धरणात 81.23 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या सहा दिवसापासून पवना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 97.17 टक्के इतका होता. आता पिंपरी चिंचवड महापालिकेकडून पाणीकपात रद्द होईल की नाही याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.