Pune : गणेश पेठ येथून सात लाख रुपयांचे अवैध तंबाखूजन्य पदार्थ जप्त; अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई

एमपीसी न्यूज – अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथकाने धडक कारवाई करीत गणेश पेठ येथून सात लाख रुपयांचे अवैध तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. आज शनिवारी (दि.28) ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी प्रकाश मोहनलाल जैनानी (वय 31 रा. हडपसर), याला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांना फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश पेठ पांगुळ आळी भागात असणारे एस. राजेश ट्रेडर्स या दुकानात बंदी असलेले व अवैध तंबाखूजन्य पदार्थ आणि सिगारेटची विक्री चालू आहे, अशी माहिती मिळाली.

त्यानुसार टिकोळे यांनी स्टाफसह जाऊन राजेश ट्रेडर्स येथे छापा मारला असता तिथे सात लाख रुपयांचे अवैध तंबाखूजन्य पदार्थ आणि विविध कंपन्यांची इंपोर्टेड सिगारेटची विक्री करताना मिळून आले. पोलिसांनी सर्व एकूण 07 लाख 04 हजार 625 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच तिथे हजर असलेल्या प्रकाश जैनानी यांच्यावर कोटपा अक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली.

या कारवाईत अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथक पूर्व विभाग पोलीस निरीक्षक सुशील काकडे, पोलीस हवालदार महेंद्र पवार, पोलीस नाईक रामचंद्र यादव, चालक पोलीस शिपाई योगेश मोहिते यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.