Pimpri : राज्य स्तरीय कॅरम स्पर्धेत शब्बीर खान चौथ्या फेरीत

एमपीसी न्यूज – चारुशीला कुलकर्णी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त उत्कर्ष स्पोर्ट्स अकादमी व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य मानांकन स्पर्धा सुरु आहेत. स्पर्धेमध्ये मुंबई उपनगरच्या शब्बीर खानने मुंबई उपनगरच्याच प्रफुल्ल आडारकरला तिसऱ्या फेरीत पराभूत करून पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचे उद्घाटन भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष भारत देसडला, कॅरम असोसिएशन पुण्याचे सचिव नंदू सोनावणे, कार्याध्यक्ष आशुतोष धोडमिसे, उत्कर्ष स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष मंदार कुलकर्णी आदी उपस्थित होते. राज्य मानांकन स्पर्धेच्या तिस-या फेरीत शब्बीर खानने प्रफुल्ल आडारकर याला 25-10, 10-25 व 25-20 गुणांनी पराभूत केले.

पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीचे निकाल –

झैद अहमद (ठाणे) विरुद्ध विजय सोनावणे (पुणे) : 25-01, 25-05
योगेश धोंगडे (मुंबई) विरुद्ध सुलेमान शेख (पुणे) : 25-00, 25-00
पंकज पवार (मुंबई) विरुद्ध धर्मेंद्र कुमार (मुंबई) : 25-13, 25-00
अभिषेक चव्हाण (रत्नागिरी) विरुद्ध नौशाद शेख 25-01, 25-07
संजय मांडे (मुंबई) विरुद्ध स्वप्नील पालवणकर (रायगड) 25-10, 25-14
अनिल मुंढे (पुणे) विरुद्ध सचिन पवार (पालघर) 25-06, 25-11
विलास आंबवले (ठाणे) विरुद्ध सुरेश पंडित (मुंबई उपनगर) 10-25, 25-05, 14-11
जलाल मुल्ला (सातारा) विरुद्ध समीर शेख (ठाणे) 25-00, 25-06
अख्तर शेख (कोल्हापूर) विरुद्ध सुरेंद्र कदम (पुणे) 25-00, 25-00
योगेश परदेशी (पुणे) विरुद्ध दिलीप काळे (मुंबई) 25-00, 25-02
सुरेश बिस्त (रायगड) विरुद्ध दीपक मारू (मुंबई) 08-25, 25-00, 25-02

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.