Maharashtra Politics : दिल्लीत शहा, फडणवीस आणि शिंदे यांची खलबते, खाते वाटपाचा गुंता वाढण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या (Maharashtra Politics) दिल्लीला आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.

 

मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या दिल्ली भेटीच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीससुध्दा उपस्थित होते. शुक्रवारी रात्री सव्वाचार तास अमित शाह, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर रात्री दोन वाजता शाह यांच्या घरातून एकनाथ शिंदे आणि फडणवीस बाहेर पडले. यामध्ये मंत्रीपदाचे (Maharashtra Politics) वाटप आणि शिवसेनेने नव्या सरकारविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर येत्या 11 तारखेला सुनावणी होणार आहे. त्यावर चर्चा झाल्याचे कळते आहे. शिंदे गट आणि भाजपमधील काही आमदार हे विशिष्ठ मंत्रीपदासाठी आग्रही असल्याने खाते वाटपाचा गुंता वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

 

 

 

मंत्रीपदावरुन नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या आधीच राजीनामा दिला. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपने राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. एकनाथ शिंदे यांना अनपेक्षीत मुख्यमंत्रीपद मिळाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. नव्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला मात्र आता मंत्रीपदाच्या वाटपावरुन घोड आडण्याची शक्यता आहे. शिंदे गट आणि भाजपमधील अनेक आमदार मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.काही आमदार हे विशिष्ठ खाते मिळावे यासाठी आडून बसले आहेत.त्यामुळे मंत्रीपदावरुन नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.