Pune Metro : पुणे मेट्रो कार्यालयांचे सिव्हिल कोर्ट स्थानक परिसरात स्थलांतर

एमपीसी न्यूज – नागरिकांच्या सोयीसाठी पुणे मेट्रोचे घोले रस्ता येथील संचालक कार्यालय आणि कोरेगाव पार्क येथील कॉर्पोरेट कार्यालय सिव्हिल कोर्ट मेट्रो (Pune Metro) स्थानकाच्या परिसरात स्थलांतरित करण्यात आले आहे.

Pune : अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात केली महाआरती 

पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच मेट्रोचा पुढील मार्ग सुरु करण्यात येणार आहे. या मार्गामध्ये सिव्हिल कोर्ट हे इंटरचेंज स्थानक आहे. याच परिसरात पुणे मेट्रो प्रकल्पाच्या मेट्रो भवनची उभारणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सिव्हिल कोर्ट हे स्थानक शिवाजीनगर ते हिंजेवाडी या मेट्रो लाईनच्या स्थानकातून प्रवाशांच्या सोयीसाठी पादचारी पुलाने जोडले जाणार आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी पुणे मेट्रो प्रकल्पाचे घोले रस्ता येथील संचालक कार्यालय आणि कोरेगाव पार्क येथील कॉर्पोरेट कार्यालय सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाच्या परिसरात स्थलांतरित करण्यात आले आहे. या परिसरातील  A 3 ब्लॉकमध्ये संचालक कार्यालय, प्रशासन विभाग, वित्त विभाग, मानव संसाधन विभाग तर ‘A 2’ ब्लॉकमध्ये खरेदी व निविदा विभाग, भूमी विभाग, भूमिगत मेट्रो बांधणी विभाग स्थलांतरित झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.