Shirgaon : पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्याचा शिरगावातील ग्रामस्थांनी केला निषेध

एमपीसी न्यूज- पुलवामा येथे अतिरेक्यांकडून करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आज, शुक्रवारी प्रति शिर्डी शिरगावातील ग्रामस्थांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

पुलवामा येथे गुरुवारी अतिरेक्यांकडून करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ३९ जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्यामुळे देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. आज, शुक्रवारी प्रति शिर्डी शिरगावातील ग्रामस्थांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध व्यक्त केला.

यावेळी श्रद्धांजली सभा घेऊन गावातून शांतता रॅली काढली. यात मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी,आणि नागरिक सहभागी झाले होते. यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी माजी सरपंच राजाराम गोपाळे, जगन्नाथ गोपाळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष मुऱ्हे, उपसरपंच भानुदास गोपाळे, माजी उपसरपंच रामभाऊ गोपाळे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण गोपाळे, मोहन अरगडे, मारुती गोपाळे, योगेश गोपाळे, समीर अरगडे, स्मिता ठोकळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.