Shiv Chhatrapati Award : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटू व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य(Shiv Chhatrapati Award) करणाऱ्या व्यक्तींनी 2022-23 साठीच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 22 जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रतिवर्षी राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात(Shiv Chhatrapati Award) उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात.

Pimpri : घर सामानाचा टेम्पो अडवून ठेवल्या प्रकरणी सोसायटीच्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल

त्यामध्ये ज्येष्ठ क्रीडा महर्षींकरीता जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) आणि महिला क्रीडा मार्गदर्शकासाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

या पुरस्कारांसाठी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in/sports_web  या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.