Talegaon : दुचाकी विक्रीच्या बहाण्याने वृद्धाची फसवणूक

एमपीसी न्यूज – दुचाकी विक्रीच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तीने एका वृद्ध व्यक्तीची 35 हजारांची (Talegaon)फसवणूक केली. ही घटना 4 जानेवारी रोजी मावळ तालुक्यातील वराळे येथे घडली.

वसंत विश्वनाथराव सुतार (वय 65, रा. वराळे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय बाळू कसबे असे नाव सांगणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : घर सामानाचा टेम्पो अडवून ठेवल्या प्रकरणी सोसायटीच्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुतार यांच्या सोसायटीचे सुरक्षा रक्षक (Talegaon)अशोक शिवेकर हे 4 जानेवारी रोजी सुतार यांच्याकडे आले. शिवेकर यांनी फेसबुकवर एक दुचाकी 19 हजार रुपयांना विक्रीसाठी असल्याचे सुतार यांना सांगितले. मात्र त्याचे पैसे ऑनलाईन माध्यमातून द्यावे लागणार आहेत. आपल्याला ऑनलाईन पैसे पाठवता येत नसल्याने तुम्ही संबंधित व्यक्तीला पैसे पाठवण्याची सुतार यांना विनंती केली.

 

त्यानुसार सुतार यांनी अनोळखी व्यक्तीला वेळोवेळी एकूण 35 हजार 300 रुपये पाठवले. मात्र त्यानंतर दुचाकी न देता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

https://www.youtube.com/watch?v=yiL5tv7B0bU&t=3s&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.