Wakad : बांधकाम साईटवरून एक लाख 18 हजारांची वायर चोरीला

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवर ठेवलेली एक लाख 18 हजार (Wakad)रुपये किमतीची वायर अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 6) सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास वाकड येथील डब्ल्यू 57 प्रोजेक्ट साईड या बांधकाम साईटवर उघडकीस आली.

सचिन मधुकर मोरे (वय 34, रा. आंबेगाव, पुणे) यांनी याप्रकरणी (Wakad)वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Cricket: डकवर्थ लुईस नियमानुसार व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी विजयी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील भूमकर चौकाजवळ डब्ल्यू 57 प्रोजेक्ट साईड ही बांधकाम साईट सुरु आहे. कामासाठी साईटवर वायर ठेवण्यात आली होती. अर्थिंगसाठी लावलेली एक लाख 18 हजार 800 रुपये किमतीची 4400 मीटर केबल अज्ञात चोरट्यांनी कापून चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.