Shiv jayanti 2022 : प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – प्रभाग क्रमांक 15 मधील शाहूनगर, संभाजी नगर, पूर्णानगर, शिवतेज नगर, फुलेनगर, शिवाजी पार्क, एचडीएफसी कॉलनी परिसरात ‘शिवजयंती घरोघरी रांगोळी दारोदारी’ या उपक्रमातून शिवजयंती साजरी करण्यात आली. या उपक्रमास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचविण्याच्या उद्देशाने प्रसाद ढमढेरे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.

या रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर, संभाजीनगर येथे पार पडला. यामध्ये प्रथम क्रमांक लक्ष्मी कोकाटे, द्वितीय क्रमांक शितल मोटे, तृतीय क्रमांक अंकिता इंगळे यांनी पटकाविला. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.

बक्षीस वितरण सोहळ्यासाठी विलास जेऊरकर, संजय ढेंबरे, राजाभाऊ म्हस्के, संपत बोत्रे, परबती वाडकर, यशवंत कन्हेरे, सुजित रासकर, मोना नेहते, स्वा सावरकर प्रतिष्ठान, स्वा. सावरकर मित्र मंडळ आणि सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पवार यांनी केले. संपत बोत्रे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.