Chinchwad News : दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले महिलेचे गंठण

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले आहे. शाहुनगर, चिंचवड येथे गुरूवारी (दि.24) ही जबरी चोरीची घटना घडली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून, दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 392, 34 अंतर्गत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले आहे. 60 हजार रूपये किंमतीचे गंठण असल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.