Mohannagar News : प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाचे शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील जुन्या नुतनीकरण केलेल्या प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाचे
शिवसेना उपनेते, सातारा संपर्कप्रमुख नितीन बानगुडे- पाटील, पिंपरी-चिंचवड सहसंपर्क प्रमुख वैभव थोरात यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरवात प्रभागांतील अंध व्यक्तींच्या संगीताने सुरू करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये फीत कापून उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला. याप्रसंगी प्रभागाच्या माजी नगरसेविक मीनल यादव यांनी प्रथम सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. सुलभा उबाळे ,शहरप्रमुख सचिन भोसले , राजेश वाबळे, युवराज कोकाटे , भाविक देशमुख ,वैशाली मराठे उपस्थित होते.

मीनल यादव यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये झालेल्या विविध विकासकामांचा, कोरोनाच्या काळामध्ये पुरविलेल्या सेवांचा, मदतीच्या कामाला उजाळा दिला.

दरम्यान, सुलभा उबाळे ,शहराध्यक्ष सचिन भोसले ,संपर्कप्रमुख वैभव थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मीनल यादव व शिवसेना संघटक विशाल यादव यांच्या कामाचे विविध विकासकामांचे कौतुक केले.

बानगुडे पाटील यांनी ” शिवसेना काल, आज आणि उद्या ” या विषयावर साधारणत एक ते दीड तास आपले मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचलन अक्षय मोरे यांनी केले तर, विशाल यादव यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन मोहननगर शिवसेना शाखा, विशाल यादव युवा मंच ,अष्टविनायक मित्र मंडळ, युवा सहकारी, ज्येष्ठ शिवसैनिक यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.