Pimpri News : इंधन 25 रूपयांनी वाढत नाहीत तोवर पुरवठा नाही, नायरा एस्सार कंपनीच्या अजब फतव्यामुळे डिलर्स हवालदिल

एमपीसी न्यूज – दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत. इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे नायरा एस्सार कंपनीच्या अजब फतव्यामुळे कंपनीचे डिलर्स हवालदिल झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर अजून 25 रूपयांनी वाढत नाहीत तोवर पुरवठा करणार नाही असे कंपनीने जाहीर केले आहे. यामुळे महाराष्ट्रातील 700 ते देशभरातील 5,000 पेट्रोल पंप डिलर्सना आर्थिक फटका बसत आहे.

नायरा एस्सार कंपनीच्या पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशने याबाबत माहिती देण्यासाठी आज (मंगळवार, दि.05) पिंपरी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी असोसिएशचे अध्यक्ष योगेश बाबर यांच्यासह पदाधिकारी आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेले पंप चालक उपस्थित होते.

असोसिएशनचे अध्यक्ष योगेश बाबर म्हणाले, रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती मुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी, नायरा एस्सार कंपनीने डिलर्स लोकांचा मागील 10 दिवसांपसून पेट्रोल डिझेल पुरवठा बंद केला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर अजून 25 रूपयांनी वाढत नाहीत तोवर पुरवठा करणार नाही असे कंपनीने जाहीर केले आहे. यामुळे महाराष्ट्रातील 700 ते देशभरातील 5,000 पेट्रोल पंप डिलर्सना आर्थिक फटका बसत आहे.

याप्रकरणी असोसिएशनच्या वतीने केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे गा-हाणे मांडले. गडकरी यांनी केंद्रिय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याशी चर्चा करून विषय सोडविण्याचा प्रयत्न करतो असे आश्वासन दिले आहे, असे बाबर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.