Shirur : शिवराज्याभिषेकदिनीच डॉ. अमोल कोल्हे संसदेत

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (गुरुवारी) शिवराज्याभिषेकदिनी संसदेत आपले पहिले पाऊल ठेवले. संसदेत जाताच कोल्हे यांनी सर्वप्रथम तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन आनंद व्यक्त केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या डॉ. अमोल कोल्हे  शिरुर लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत.  खासदार झाल्यानंतर आज पहिल्यांदाच कोल्हे यांनी लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत पाऊल ठेवल आहे. संसदेत जाताच कोल्हे यांनी सर्वप्रथम तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन आनंद व्यक्त केला आहे. तसेच शिवराज्याभिषेकदिनी संसदेत आपले पाऊल पडल्याचेही कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन म्हटले आहे.

संसेदत पोहोचल्याचा मनस्वी आनंद त्यांनी व्यक्त केला आहे. ”छत्रपतींच्या मावळ्याचं “संसदेत”आज पहिलं पाऊल आणि मुहूर्त “शिवराज्याभिषेक दिनाचा”! अभिमान, कृतज्ञता आणि जबाबदारी!!!, असे म्हणत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतल्याचा फोटो फेसबुक वर शेअर केला आहे.

दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे यांनी  शिवसेनेच्या खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.