Pimpri: लाचखोर कर्मचा-यांना पुन्हा सेवेत घेतल्याने महासभेत पडसाद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लाचखोर 16 निलंबित कर्मचा-यांना पुन्हा महापालिकेत सेवेत घेतलेल्या प्रकरणाचे आज (गुरुवारी) झालेल्या महासभेत तीव्र पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी निलंबन आढावा समितीच्या या निर्णयाचा आणि आयुक्तांचा निषेध केला.

महापालिकेच्या 16 निलंबित कर्मचा-यांना निलंबन आढावा समितीने पुन्हा सेवेत घेतले आहे. त्यावरुन विविध आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यापार्श्वभूमीवर आज झालेल्या महासभेत या निर्णयाचा पडसाद उमटले. या विषयावर महासभेत सुमारे अर्धा तास चर्चा झाली.

  • भाजप नगरसेविका सीमा सावळे म्हणाल्या, तत्कालीन लघुलेखक राजेंद्र शिर्के यांच्यावर झालेल्या कारवाईच्या दिवशीचे सर्व ‘सीसीटीव्ही’ फुटेज दाखवा. या घटनेमागील सर्व घडामोडी उलगडून, यामागे नेमका कोणाचा हात आहे? हे स्पष्ट होईल.

विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, ”आयुक्‍त आपल्या अधिकारांचा गैरवापर करत आहेत. त्यांनी करदात्या नागरिकांना आपल्या कृतीने चुकीचा संदेश दिला आहे. तुम्हाला या 16 निलंबित कर्मचा-यांकडून चहापाणी झाले आहे का? असे सवाल उपस्थित करत त्यांनी आयुक्तांचा निषेध केला”.

  • सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले की, ”भ्रष्ट कर्मचा-यांना स्वेच्छा निवृत्ती देऊन कायमचे घरी बसवा. यासाठी आम्ही महापालिका प्रशासनाच्या मागे ठामपणे उभे आहोत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.