Alandi : डॉ. अमोल कोल्हेंनी जाणून घेतल्या आळंदी शहरातील पाणी समस्या

एमपीसी न्यूज – डॉ. अमोल कोल्हेंनी आज  आळंदी शहरातील ( Alandi) पाणी समस्या जाणून घेतल्या. कमलबाई रमेश वडगांवकर (कर्नावट ) यांचे  वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यासाठी डॉ. अमोल कोल्हे  आज आळंदीमध्ये आले होते. यावेळी महिलांनी त्यांना आळंदी शहरातील पाणी समस्येबद्दल सांगितले.

डॉ.अमोल कोल्हे यांनी आळंदी शहरातील पाणी समस्येबद्दल  आळंदी नगरपरिषदेला  पत्र दिले होते. त्याबद्दल यावेळी चर्चा  झाली.   महिलांनी सांगितले पाणी अजून ही अवेळी येत आहे. सारख्या पाईप लाईन फुटत आहेत .संबंधित समस्या सोडवण्यासाठी आधिकारी यांना सांगतो असे यावेळी डॉ. अमोल कोल्हे त्यांना सांगितले.

आळंदी नगरपरिषदेने पाण्याबाबत वेळापत्रक जाहीर केले असून मुख्य जलवाहिनी लिकेजची समस्या आल्याने आळंदी शहरात अवेळी पाणीपुरवठा होत आहे.आळंदी शहरास स्वतंत्र पाणीपुरवठा योजना नसल्याने पुणे मनपा मार्फत मिळणाऱ्या पाण्यावर शहरातील पाणीपुरवठा अवलंबून आहे.
जलशुद्धीकरण केंद्र ते पाण्याच्या टाक्या यांना जोडणारी जलवाहिनी जीर्ण झाली असून ती बदलण्यासाठी निधी मंजूर झाला असून पुढील दोन महिन्यात ते काम पूर्ण होईल.तसेच पाणी क्षमता वाढविण्यासाठी नवीन पाण्याच्या टाक्यांची उभारणी,अनधिकृत नळ कनेक्शन रेकॉर्ड वर घेऊन कर आकारणी व पाणी वाया घालविणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे अश्या उपाय योजना प्रस्तावित आहेत, असे यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी ( Alandi) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.