Today’s Horoscope 16 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग (Today’s Horoscope 16 March 2024 )
आजचा दिवस – शनिवार.
तारीख – १16.03.2024
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – रोहिणी 16.06 पर्यंत.
चंद्र राशी – वृषभ.
—————————–
मेष- ( शुभ रंग- केशरी)
वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता भासणार नाही. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांना चांगला वाव मिळेल. गायक कलाकारांना आज रसिक मनसोक्त दाद देतील.

वृषभ (शुभ रंग- डाळिंबी)
जिथे जाल तिथे आज आपलीच मर्जी चालवायचा तुमचा प्रयत्न असेल. घाई गर्दीत आज काही चुकीचे निर्णय घ्याल. उपवर असाल तर आज सुयोग्य स्थळे चालून येतील.

मिथुन (शुभ रंग – मोतिया)
विविध मार्गाने आलेला पैसा विविध मार्गाने जाईल. आज तुम्ही सहकुटुंब चैन कराल. जोडीदाराला एखादी सरप्राईज गिफ्ट द्याल. आज गरजेपुरतेच तुम्ही आध्यात्मिकही व्हाल.

कर्क ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल. आज सज्जनांचा सहवास लाभेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत कराल.

सिंह ( शुभ रंग- हिरवा) (Today’s Horoscope 16 March 2024)
आज ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण असणार आहे. कामाच्या व्यापात घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. आज कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. अति व्यस्त दिवस.

Alandi : डॉ. अमोल कोल्हेंनी जाणून घेतल्या आळंदी शहरातील पाणी समस्या

कन्या (शुभ रंग- पिस्ता)
कोणतेही नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. व्यवसायात काही अनपेक्षित अडचणी येऊ शकतात. आज आईच्या तब्येतीची विचारपूस करा.

तूळ( शुभ रंग- पांढरा)
हितशत्रू कदाचित तुमच्या मित्रांमध्येच लपलेले असू शकतील. कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. आज प्रवासात मोठ्या रकमेची ने आण करताना सावध राहायला हवे.

वृश्चिक ( शुभ रंग- गुलाबी)
आज तुम्ही इतरांच्या भांडणात यशस्वी मध्यस्थी करणार आहात. एकतर्फी प्रेमाला होकार मिळण्याची चिन्हे दिसू लागतील. वैवाहिक जीवनातील लज्जत वाढेल.

धनु (शुभरंग- आकाशी)
आज व्यवसायात उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अविश्रांत कष्टांशिवाय दुसरा पर्याय नाही. तब्येतीच्या बाबतीतही जागरुक रहा, किरकोळ दुखणे ही अंगावर काढू नका.

मकर(शुभ रंग- निळा)
काही रसिक मंडळी तर आज कामावर दांडी मारूनही मौजमजेला प्राधान्य देतील. नवोदित कलाकार मंडळींना ग्लॅमरची चव चाखता येईल. खेळाडू स्पर्धा जिंकतील.

कुंभ ( शुभरंग- सोनेरी)
आज कुठेच न जाता कुटुंबीयांना वेळ देण्याचा तुमचा मूड असेल. आज गृहिणींना गृह उद्योगातून चांगली कमाई होईल. आईने दिलेले सल्ले योग्यच असतील.

मीन (शुभ रंग- चंदेरी)
शेजाऱ्यांशी क्षुल्लक कारणांनी झालेले गैरसमज दूर होऊन सलोखा वाढेल. काही जणांना अचानक जवळपासच्या प्रवासाला निघावे लागू शकते. घराबाहेर वाद-विवाद टाळा.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.