Raigad : शिवराज्याभिषेकदिनी पार्थ पवार रायगडावर

एमपीसी न्यूज – हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे, ‪महापराक्रमी राजे छत्रपती शिवाजी महाराज‬ ‪यांच्या राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी किल्ले रायगडावर उपस्थित राहून शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले.

यावेळी छत्रपती संभाजी राजे, त्यांचे चिरंजीव युवराज छत्रपती शहाजी राजे, राजगड जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाड तालुका अध्यक्ष निलेश महाडिक उपस्थित होते.

निवडणुकीनंतर पार्थ पवार मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. जाहीर कार्यक्रमात ते सहभागी होत आहेत. चार दिवसांपूर्वी त्यांनी देहूरोड येथील इफ्तार पार्टीला देखील हजेरी लावली होती. त्यामुळे पार्थ पुन्हा सक्रिय झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.