Shop theft : नारायणगाव परिसरातील दुकानांमध्ये रात्रीच्या वेळेस चोऱ्या करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज : नारायणगाव परिसरातील दुकानांमध्ये रात्रीच्या वेळेस चोऱ्या करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आले आहे. (Shop theft) या चोरट्यांकडून चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुकाराम उर्फ राजेंद्र वारे, वय 21 वर्षे व रवींद्र गांगट, वय 23 वर्षे, दोघे रा. माळवाडी पळशी, ता. पारनेर, जि. अहमदनगर अशा दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात भादवि कलम 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

16 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी नारायणगाव येथील मांजरवाडी मधील फिर्यादी सोमनाथ सुपेकर यांच्या कपड्याच्या दुकानाचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला व दुकानातील कपडे, चपला तसेच इतर साहित्य व रोख रक्कम चोरून नेली होती.(Shop theft) तसेच शेजारील खत औषधाचे दुकान देखील फोडले. रात्रीच्या वेळेस होणाऱ्या अशा प्रकारच्या घरफोड्यांना आळा घालण्यासाठी आरोपींना लवकरात लवकर अटक करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.

Alandi news : अलंकापुरी फोटोग्राफर असोसिएशनचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न

त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस शाखेचे पथक या गुन्ह्यातील आरोपींच्या शोध घेत असताना घटनास्थळावर मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे आरोपींचा माग काढत टाकळी ढोकेश्वर पर्यंत पोहोचले. त्या परिसरामध्ये गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस (Shop theft) नाईक संदीप द्वारे पोलीस नाईक अक्षय नवले यांनी वेष बदलून रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, साकुर मांडवे तालुका जिल्हा अहमदनगर च्या बाजारामध्ये काही इसम नवीन कपडे तसेच चपला घालून फिरत आहेत.

गुन्हे शाखेतील पथकाने त्या ठिकाणी जाऊन त्यांचा शोध घेतला असता ते त्या ठिकाणी सापडले नाही. त्यांची अधिक माहिती घेतली असता ते आज आणे, तालुका जुन्नर या ठिकाणी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.(Shop theft) या गुन्ह्याबाबत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता हे गुन्हे त्यांनी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल तसेच चोरीस गेलेला काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

त्या आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाही साठी नारायणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कामगिरी डॉ. अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, नितेश घट्टे, अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मंदार जवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, साहेब पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे (नारायणगाव पोलीस ठाणे), पोसई गणेश जगदाळे, पोलीस हवालदार दीपक साबळे, राजू मोमीन, जनार्दन शेळके, विक्रम तापकीर, पोलीस नाईक संदीप वारे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले, निलेश सुपेकर, नारायणगाव पोलीस ठाणे कडील पोलीस नाईक दिनेश साबळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोबल यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.