Pimpri : श्रीनिवास पाटील निगडीतील ‘दशलक्षण महापर्व’ला उद्या राहणार उपस्थित

एमपीसी न्यूज – सकल जैन वर्षायोग समितीच्या वतीने आयोजित केलेल्या निगडीतील ‘दशलक्षण महापर्व’ला  सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील उद्या (रविवारी)उपस्थित राहणार आहेत. पाच ते साडेपाच या वेळेत ते आर्शिवाद घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मिलिंद फडे, अजित पाटील, जितेंद्र शहा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

निगडी, प्राधिकरणातील आयुर्वेद महाविद्यालयाजवळील सेक्टर नंबर 25 येथील जैन मंदिरात 14 ते 24 सप्टेंबर दरम्यान दशलक्षण पर्व महोत्सव आयोजित केला आहे. त्यानिमित्त गेल्या दोन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. पुलकसागर महाराज यांच्या प्रवचानाचा कार्यक्रम होत आहे.

सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील उद्या (रविवारी) सायंकाळी पाच ते साडेपाच या वेळेत ‘दशलक्षण महापर्व’ला आदर्शिवाद घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.