MCOCA On Jadhav : सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित संतोष जाधववर दुसरा मोक्का

पुणे पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज: पंजाबचा प्रसिध्द गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधवसह त्याच्या साथीदारांविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.(MCOCA On Jadhav) जाधवच्या साथीदारांनी नारायणगाव भागातील एका व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागितली होती. याप्रकरणी हा मोका लावण्यात आला आहे. संतोष जाधव याच्याविरुद्ध हा दुसरा मोक्का आहे.

International Marathon : शहरात नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन, 3 कोटींचा खर्च

संतोष सुनील जाधव (रा. पोखरी, ता. आंबेगाव, जि. पुणे), जीवनसिंग दर्शनसिंग नहार, श्रीराम रमेश थोरात (दोघे रा. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे), जयेश रतीलाल बहिरट, जिशान इलाहीबक्श मुंढे (रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे), गणेश तारु, वैभव उर्फ भोला शांताराम तिकटारे (रा. जळकेवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे), रोहित विठ्ठल तिकटारे (रा. सरेवाडी, ता. खेड, जि. पुणे), सचिन बबन तिकटारे (रा. नायफड. ता. खेड, जि. पुणे) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जाधव आणि त्याच्या साथीदारांनी नारायणगाव परिसरातील एका व्यावसायिकाकडे खंडणी मागितली होती. पुणे ग्रामीण पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल आहे. याप्रकरणी आरोपी नहार, थोरात, बहिरट, मुंढे, तिकटारे, तारु यांच्यासह अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी नुकतीच अटक केली. (MCOCA On Jadhav) या सर्व आरोपींच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावास नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.  या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.