Pune Crime News: महापालिका उपायुक्ताकडे 1 कोटीची अपसंपदा

उपायुक्तासह पत्नीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज: पुणे महानगरपालिकेतील आकाश चिन्ह विभागाचे उपायुक्त आणि त्यांच्या पत्नीवर पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News) या दोघांकडे उत्पन्नापेक्षा 1 कोटी 2 लाख रुपयांची अधीकची संपत्ती आढळून आली आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचकडून तक्रार देण्यात आली आहे.

 

विजय भास्कर लांडगे (वय 49) आणि शुभेच्छा विजय लांडगे (वय 43) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.  याप्रकरणी अधिक माहिती अशी की, विजय लांडगे हे पुणे महानगरपालिकेत आकाश चिन्ह विभागात उपायुक्त म्हणून कार्यरत होते. (Pune Crime News) 2000 ते 2021 या कालावधीत ते नोकरीला होते. त्यांच्या संपत्तीची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली असता त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जादा एक कोटी दोन लाख रुपयांची अपसंपदा आढळून आली आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे यांनी तक्रार दिली आहे.

उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा एकूण उत्पन्नाच्या 31.59 टक्के अधिकची संपत्ती मिळवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यात त्यांची पत्नी शुभेच्छा लांडगे हिने अपसंपदा जमा करण्यासाठी मदत केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या दोघांविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.