Bopkhel : सिगारेट न मिळाल्याने 7 ते 8 जणांनी केली दुकान मालकास मारहाण

एमपीसी न्यूज : किराणा दुकानात सिगारेट न मिळाल्याने चिडून 7 ते 8 जणांनी मालकास मारहाण (Bopkhel) केली व तोडफोड करून घरावर दगडफेक केली. याबाबत लक्ष्मण भाटी ( वय 42 वर्षे, रा. बोपखेल) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना 3 जुलै रोजी घडली.

यश उर्फ बबलू दिसले (रा. गणेशनगर, बोपखेल), तेजस खरात आणि तुषार डोंगरे, (रा. रामनगर, बोपखेल), बबलू घुले (रा. बोपखेल) व इतर 3 ते 4 इसम सर्वांचे वय 20 ते 25 वर्षे (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) आहे. फिर्यादीचे दुकान त्यांच्या घराशेजारीच आहे.

Moshi Rto: चारचाकींसाठी नवीन मालिका; आकर्षक क्रमांक राखून ठेवता येणार!

आरोपी यश दिसले व तेजस खरात हे दुकानात आले व बाकीचे सर्वजण बाहेर थांबले होते. त्यावेळी आत आलेल्या दोन आरोपिंनी फिर्यादीकडे सिगारेट मागितली. तेव्हा फिर्यादीने ते सिगारेट विकत नसल्याचे सांगितले. तेव्हा त्या दोघा आरोपींनी फिर्यादीच्या कानाखाली मारल्या व दुकानातील बरण्या व सामान फेकून दिले. त्यावेळी दुकान मालकीण व त्यांच्या घरातील लोक सोडवण्यासाठी आले असता आरोपीने त्यांना ढकलले. आरोपींनी दुकान मालकाच्या घरावर दगड फेकून मारले. त्यातील एक दगड दुकान मालकीनीच्या भाच्याच्या डोक्यात लागून तो जखमी झाला. सदर दगड कोणाला लागले असते तर लोकांच्या जीवास धोका झाला असता. काही आरोपींकडे लोखंडी कोयते होते. त्यांनी लोकांना शिवीगाळ (Bopkhel) केली व रस्त्याने जाणाऱ्या लोकांना मारहाण केली व पोलिसात तक्रार केली तर मारण्याची धमकी दिली.

आरोपीं विरोधात भा. द. वि. कलम 324, 336, 323, 427, 504, 506(2), 143, 147, 148, 149, भारतीय हत्यार कायदा कलम 37(1) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.