Sangvi : सॉफ्टवेअर अभियंत्याचे घर फोडले; साडेतीन लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – सॉफ्टवेअर अभियंत्याचे घर फोडले. यामध्ये चोरट्यांनी 3 लाख 29 हजार 900 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 8) रात्री 9 ते रविवारी (दि. 9) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास सांगवी मधील पिंपळे सौदागर येथे घडली.

मयंक ओमप्रकाश चंद (वय 29, रा. फ्लॅट नं. 601, पार्ट बी, नम्रता सॅटेलाईट अपार्टमेंट, पिंपळे सौदागर, सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद शनिवारी रात्री कामानिमित्त बाहेर गेले होते. रात्री अज्ञात चोरटयांनी त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. त्यामध्ये 1 लाख 15 हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार, 1 लाख लाख रुपये किमतीचे चार बांगड्या 25 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, 25 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चार अंगठ्या, 25 हजारांच्या कानातील रिंगा, 20 हजारांची सोन्याची साखळी, 9 हजारांचे चांदीचे जोडवे, 4 हजारांचे चांदीचे पैंजण आणि 15 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 3 लाख 29 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरला. रविवारी पहाटे साडेचारच्या सुमरास चंद घरी परतले, तेंव्हा हा प्रकार उघडकीस आला. यावरून गुन्हा नोंदविण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.