Pimpri Chinchwad RTO : प्रवासी बसेसचे रस्त्यावर होणारे अपघात रोखण्यासाठी विशेष मोहीम

एमपीसी न्यूज – रस्त्यावर होणारे प्रवासी बसेसचे अपघात टाळण्यासाठी करावयाच्या अंमलबजावणी व उपाययोजनांबाबत परिवहन आयुक्तांनी दिलेल्या सूचनांनुसार पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्लीपर बसेस, स्कूल बसेस, टुरिस्ट बसेस अशा सर्वच प्रकारच्या प्रवासी बसेसची तपासणी मोहीम सुरु केली आहे.

Talegaon Dabhade : इंद्रायणी विद्यामंदिर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – रामदास काकडे

या मोहिमेत रास्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे अशा स्पीड गव्हर्नर, आपत्कालीन दरवाजा (Emergency Exit ), रिफ्लेक्टर्स, वाईपर्स, इंडिकेटर्स, अग्निशामन यंत्रणा (Fire Extinguisher), प्रथमोपचार सुविधा व आवश्यक कागदपत्रे आदी बाबींची तपासणी करण्यात येत आहे.

 

तसेच काही बसचालक हे मद्यपान करून वाहन चालवीत असल्यामुळे अपघात व मोठी जीवितहानी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या धर्तीवर सर्व प्रकारच्या बसचालकांची ब्रिथ ऍनालायझर द्वारे तपासणी करून मद्यपान करून बस चालवणाऱ्या बस चालकांची तपासणी सुरु करण्यात आलेली आहे.

 

या मोहिमेअंतर्गत 196 प्रवासी बसेसची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये एकूण 80 वाहने दोषी आढळून आलेली आहेत. तसेच एक बस चालकाला मद्यपान करून वाहन चालविण्याच्या गुन्ह्या अंतर्गत चलन देऊन गुन्हा दाखल केलेला आहे. या विशेष मोहिमे अंतर्गत 2 लाख 72 हजार 200 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.