Pimpri News : मोरे, चिलेकर, लांडगे यांना सृजन प्रतिष्ठानचा समाजदूत पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड येथील सृजन प्रतिष्ठान च्या वतीने स्व.दिगंबरराव कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या समाजदूत या पुरस्कारासाठी (Pimpri News) यावर्षी दैनिक लोकमतचे जेष्ठ वार्ताहर डॉ विश्वास मोरे, जेष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, सुनील लांडगे आणि पिंपरी-चिंचवड साहित्य क्षेत्रातील तीन जेष्ठ साहित्यिक प्राध्यापक तुकाराम पाटील,राजेंद्र घावटे, राज अहेरराव यांची निवड करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील पाडळी या गावचे जि. प. निवृत्त शिक्षक स्व. दिगंबरराव कुलकर्णी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पिंपरी-चिंचवड स्थित मुलगा विवेक कुलकर्णी यांनी वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सृजन प्रतिष्ठान ही संस्था स्थापन करून त्या संस्थेच्या माध्यमातून समाजातल्या कर्तृत्ववान व्यक्तींचा यथोचित स्नमान करण्याची अभिनव कल्पना अंमलात आणली आहे. कुठल्याही आधाराविना आपल्या अलौकिक कर्तृत्वाने आपले कर्म करताना ते सामाजिक भान आणि कर्तव्य जपत सामान्य ते असामान्य असा प्रवास करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा ते गौरव करतात. त्यांच्या पावलावर पाऊल टाकणारे अनेक समाजदूत/लोकदुत या निमित्ताने तयार व्हावेत इतकीच माफक अपेक्षा असल्याची भावना सृजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष  विवेक कुलकर्णी यांनी विशद केली.

Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालय वाणिज्य शाखेच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन 

मागील वर्षीच्या दुसऱ्या पुरस्कार सोहळ्यात बीड जिल्ह्यातील आदर्श शिक्षक प्रभाकरराव मानूरकर गुरुजी यांचे तिसरे अपत्य आणि बीड जिल्ह्यातील एक आदर्श पत्रकार संतोषजी मानूरकर,जालना येथे असलेले आणि मूळचे ढोकवड येथील असलेले डॉ श्रीमंत मिसाळ यांना या निमित्ताने गौरविण्यात आले होते.(Pimpri News) तर प्रथम वर्षी पुणे येथे झालेल्या पहिल्या कार्यक्रमात पिंपरी येथील जेष्ठ पत्रकार  विवेक इनामदार, डॉ सुवर्णा अभय दिवाण आणि जेष्ठ साहित्यिक सुरेश कंक यांना गौरविण्यात आले होते.

डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या पुरस्कार सोहळ्याचे वितरण केले जाईल आहे. स्मृतीचिन्ह,एक ग्रंथ आणि शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे रूप असेल. अशी माहिती सृजन प्रतिष्ठाच्या वतीने देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.