Chikhali : दिवाळीनिमित्त गावाला गेलेल्या घरात चोरी

एमपीसी न्यूज – दिवाळीनिमित्त गावाला गेल्याचा फायदा घेत घरात घुसून चोरी केली. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 62 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मोरेवस्ती चिखली येथे घडली.

दत्तात्रय भास्कर शिंदे (वय 37, रा. अष्टविनायक चौक, मोरे वस्ती, चिखली. मूळ रा. तामलवाडी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, फिर्यादी दत्तात्रय आणि त्यांचे शेजारी दिवाळीच्या सणानिमित्त त्यांच्या मूळ गावी गेले होते. त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 62 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. शनिवारी (दि. 10) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यावरून दत्तात्रय यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.